औरंगाबाद मध्ये ' सैराट ' ची पुनरावृत्ती, : आई वडील यांच्या सांगण्यावरून दोन भावांनी आंतरजातीय युवकावर प्रेम करणाऱ्या सख्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून संपविले

पुणे दिनांक १७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) औरंगाबाद मध्ये एक खळबळजनक घटना घडली असून आई वडील यांच्या सांगण्यावरून दोन भावांनी मिळून बहिणीच्या आंतरजातीय प्रेमप्रकरणा वरुन आपल्या सख्या बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिचा निर्घृण खून केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी आई वडील व दोन भाऊ असे एकूण चौंघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकाणांने औरंगाबाद जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान सदरची घटना ही औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील राक्षा येथे घडली आहे.यामध्ये खून झालेल्या मुलीचे नाव चंद्रकला धोंडिबा बावस्कर. ( वय ३५ रा.तोंडापूर या.जामनेर ) असं आहे.याबाबत फर्दापूर पोलिस ठाण्यात चौंघा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.आरोपी मध्ये १) कृष्णा धोंडीबा बावस्कर व २) शिवाजी धोंडीबा बावस्कर ( दोघे भाऊ) ३) धोंडिबा सांडू बावस्कर ( वडील) ४) शेवंताबाई धोंडीबा बावस्कर ( आई) असे नावे आहेत.या घटने बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रकला व शमीम या दोघांन मध्ये आंतरजातीय प्रेम असल्याचा आई वडील व दोघा भावांना संशय होता.चंद्रकला ही पळत पळत शमीम यांच्या शेतात आली व मला माझे भाऊ मारणार आहे.मला लपव अशी म्हणाली त्यावेळी शमीम याने तिला बकऱ्याच्या गोठ्यात लपविले पण तिच्या भावांनी तिला गाठून तिच्या डोक्यात कुऱ्हाड घालून तिचा खून केला.शमीम याला देखील मारहाण केली पण तो यांच्या तावडीतून सुटका करून घेत घटना स्थळावरुन पळून गेला.व पोलिस ठाण्यात पोहचला व याबाबत पोलिसांना माहिती दिली.त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व चौंघा जणांन विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.