कंटेनर व कार अपघात : मुंबई ते पुणे महामार्गावर भीषण अपघात दोघाचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी

पुणे दिनांक २१ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुणे - मुंबई एक्सप्रेस महामार्गावर अपघात झाला असून या भीषण अपघातात भरघाव वेगाने जाणारा कंटेनर उलटून स्विफ्ट डिझायर कारला धडकून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून अन्य चार जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.
दरम्यान याप्रकरणी रायगड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघात ग्रस्त कंटेनर हा भरघाव वेगाने जात असताना तो अचानक पणे उलटला व स्विफ्ट डिझायर कारला जोरात धडक दिल्याने या भीषण झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य चार जण हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत जखमींना कामठी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.मृत्यू मध्ये एक पुरुष व एक महिलाचा समावेश आहे.अपघाता नंतर वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.अपघातात अन्य वाहनांचे नुकसान झाले असून या अपघात प्रकरणी कामठी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.