Crimes : वाई येथील न्यायालयात गोळीबार नंतर सातारा कारागृहात दोन गटात तुंबळ हाणामारी

पुणे दिनांक १४ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील न्यायालयात मागील आठवड्यात झालेल्या गोळीबारानंतर पून्हा एकदा जाधव व नवघणे यांच्या समर्थकांन मध्ये तुफान हाणामारी झाली आहे.बंटी जाधव यांच्या समर्थकांनी गोळीबार करणाऱ्या राजेश नवघणे व त्यांच्या दोन साथीदारावर जिल्हा कारागृहातच हल्ला केला आहे.या हल्ल्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांची नावे मनोज वाघमारे.सिध्देश घाडगे.व परमेश्वर जाधव अशी आहेत.या प्रकरणी वाई पोलिस ठाण्यात १५ जणांनवर खंडणी व दरोड्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या प्रकरणी मुख्य संशयित अनिकेत उर्फ बंटी जाधव.( रा.भुईज ) निखिल मोरे व अभिजित मोरे.( दोघे या.गंगापुरी ) यांना न्यायालयीन कामकाज साठी आणून त्यांना बाहेरच्या बाकड्यावर बसवले असता नवघणे यांने वकिलांच्या वेशात येऊन फाईल मध्ये लपवून आणलेल्या रिव्हालवर मधून या तिघांवर हल्ला केला होता.परंतू गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रिव्हालवर व चार जिवंत काडतुसे जप्त करत त्याला अटक केली होती.या गुन्ह्यात राजेश नवघणे व त्यांचे दोन साथीदार शरदराव रवींद्र पवार व विजय अंकोशी सहभागी होते.पोलिसांनी त्यांना अटक केली होती.या सर्वांना जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
दरम्यान या कैद्यांना दररोज सकाळी १०ते १२ रोज बराकी मधून बाहेर काढले जाते.याचाच फायदा घेत न्यायालयात झालेल्या हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी बंटी जाधव यांच्या समर्थकांनी विजय अंकोशी याला दगडाने तर राजेश व रवींद्र यांना लाथा बुक्यांनी मारहाण केली.या प्रकरणी कारागृह पोलिसांच्या फिर्यादी वरुन तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व या मारहाणीत जखमी झालेल्यांचे जबाब नोंदवून घेण्यास आले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.