Crime : वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलांची सोन साखळी खेचणारे दोन सराईत गुन्हेगारांच्या पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १४ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) माॅनिग वाॅक करून एक महिला तिच्या सहकारी महिला बरोबर घरी जात असतांना मथुरेवाला गार्डन येथे अचानक पणे मोटर सायकलवरून आलेल्या दोघां जणांना पैकी मागे बसलेल्या अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून चोरून नेली या प्रकरणी वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोन साखळी चोरणा-या दोघा सराईत चोरांची नावे १) उदयान दिपक ओव्हाळ ( वय २४ राहणार. केसनंद फाटा वाघोली ता.हवेली जिल्हा पुणे) २ ) आकाश सुरेश वाघीरे ( वय २०.राहणार. शिवाजी नगर रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे शांतीनगर शिवाजी नगर पुणे) अशी आहेत. या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानवडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३२९ \ २०२३ भादंवि .कलम ३९२ \ ३४ या दाखल गुन्ह्याचा तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे व पोलीस अंमलदार. विष्णू सुतार. विठ्ठल चोरमले. राहूल माने.संदीप साळवे. हे तपास करिथ असतांना माने यांनी छुप्या पद्धतीने सापळा रचून या सराईत सोन साखळी चोरांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान पोलीस यांनी या चोरट्यांन कडून चोरलेली सोन साखळी व एक मोटरसायकल असा एकूण १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वानवडी पोलीसांनी २४ तासांत या दोघांच्या मुसक्या आवळून गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर पुणे शहर रंजन कुमार शर्मा. पोलीस उपयुक्त परिमंडळ-५ पुणे शहर विक्रांत देशमुख सह.पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे. पोलीस निरीक्षक गुन्हे. पाटणकर व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे पोलीस अंमलदार. अमजद पठण. हरीदास कदम .अतुल गायकवाड. अमोल गायकवाड. संतोष नाईक.निलकंठ राठोड.यतिन भोसले. महिला पोलीस अंमलदार. सोनम भगत.यांनी केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.