भरघाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने उडविले : अहमदनगर - कल्याण महामार्गावर भीषण अपघात दोन ठार एक जखमी

पुणे दिनांक २१ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) अहमदनगर ते कल्याण महामार्गावर आतूर येथे भरघाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने पायी जाणाऱ्या युवतीला व मोटरसायकला जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात पायी जाणारी युवती व मोटरसायकल वरील महिला या दोघी ठार झाले तर मोटरसायकल वरील एकजण गंभीर रित्या जखमी झाला आहे.त्यांना उपचारा करिता आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या दोघींचे नाव १) ऋतुजा अशोक डुंबरे ( वय १९ ) २) सविता गीताराम तांबे ( वय ४५ ) या प्रमाणे आहेत.तर जखमी झालेल्या मोटरसायकल स्वार गीताराम तांबे ( वय ५२ ) यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरघाव वेगाने जाणाऱ्या पिकअपने पायी जाणाऱ्या ऋतुजाला जोरात धडक दिली व मोटरसायकला जोरात धडक दिल्याने यात दोघीजणी ठार झाल्या आहेत.या अपघाता नंतर पिकअप पल्टी झाला आहे.व चालक पळून गेला आहे.अपघात प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस पळून गेलेल्या चालकाचा शोध घेत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.