पुरंदर दुचाकीचा भीषण अपघात : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे दुचाकीची समोरा समोर धडक दोघेठार तीन जखमी

पुणे दिनांक ५ नोव्हेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे रोडवर दोन दुचाकीचा भरघाव वेगाने समोरा समोर झालेल्या धडकेत भीषण अपघातात दोन्ही दुचाकी स्वरांचा मृत्यू झाला आहे.तर अन्य तिंघेजण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी करीता तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान या अपघाताबाबत सूत्रांनद्वारे मिळालेल्या माहिती नुसार दोन्ही दुचाकीस्वार हे भरघाव वेगाने जात असताना त्यांच्या दुचाकीची समोरा समोर भीषण धडक झाली व यात दोघांचा मृत्यू झाला आहे.त्यांची नावे १) संजय नानगुडे ( वय २६ रा.पुरंदर जि.पुणे ) २) चंद्रकांत दानवले ( वय ५० रा.पुरंदर जि.पुणे ) अशी आहेत.यात अन्य तिंघे जण गंभीर रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.हे सर्वजण पुरंदर येथे राहणारे आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.