Crime : पत्ता सांगण्याच्या बहाण्याने परप्रांतीय इसमास लुटणारे दोघेजण गजाआड

पुणे. दिनांक 5 जुन .परराज्यातील एक व्यक्ति कंपनीच्या ट्रेनिंग करीता काञज भागात आला होता. सदर व्यक्तिस दोघाजणांनी पत्ता सांगण्याचा बहाणा करून त्याच्या डोक्यावर कोयत्यने वार करून त्याला गंभीर रित्य जखमी करून त्याच्याकडील रोख रक्कम 5 हजार 500 रुपये चोरून नेणाऱ्या दोघेजण व एक अल्पवयीन अशा तिघाजणांना भारती विद्यापीठ पोलीसांनी गजाआड केले आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे. 1 ) राजु नागनाथ कांबळे.( वय 20 ) 2 ) अथव॔ रवींद्र आडसुळ ( वय 20 दोघे रा.गल्ली नंबर 77 तळजाई वसाहत पदमावती पुणे.) व एक अल्पवयीन अशी आहेत. या बाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती व आरोपी फरार होते.या गुन्ह्य़ा बाबत पोलीस अंमलदार अवधूत जमदाडे अभिनय चौधरी आशिष गायकवाड. याना एक खबऱ्या कडून गुन्हेगार याची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांकडून वरील आरोपीं कडून एक मोटरसायकल व कोयता व चोरलेली रोकड असा मुद्देमाल हस्तगत केला आहे . व आरोपींन अटक केली आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे प्रविण कुमार पाटील. पोलीस उप आयुक्त परिमडळ दोन श्रीमती स्मात॔ना पाटील . सहायक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग नारायण शिरगावकर. यांच्या मार्गदर्शना खाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार. व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक. विजय पुराणिक. सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्त . पोलीस अंमलदार. अवधूत जमदाडे. अभिनय चौधरी. आशिष गायकवाड. सचिन सरपाले. शैलेश साठे.चेतन गोरे.निलेश ढमढेरे. मंगेश पवार. हर्षल शिंदे.अभिजित जाधव. सचिन गाडे. धनाजी धोत्रे. निलेश खैरमोडे. राहुल तांबे. विक्रम सांवत. यांच्या पथकाने कारवाई केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.