Crime : केशवनगर मधील मेडिकल स्टोर मध्ये राडा करणारे दोघे जण अटक

पुणेदिनांक १९ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) मुंढवा पोलीस स्टेशन अंतर्गत केशवनगर मधील मेडिकल स्टोर मध्ये राडा करून वस्तू खरेदी करून पैसे न देता लोखंडी हत्यारा धाक दाखवून मारहाण करून फरार झालेल्या दोंघाना मुंढवा पोलीसांनीअटक केली आहे
अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे १) सोपान रामेश्वर सावंत ( वय २२ राहणार सदाशिवनगर गांधीला वस्ती फुरसुंगी पुणे) २ ) अभिषेक संजय जरांडे ( वय २० राहणार जयगंगानगर केशवनगर मुंढवा पुणे) असे आहे. या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी मिळून केशवनगर मधील मेडिकल स्टोर मध्ये राडा करून वस्तू खरेदी करून पैसे न देता लोखंडी हत्यारा धाक दाखवून मारहाण करून फरार झालेल्या होते. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तांत्रिक विश्लेषण द्वारे तपास करून या दोघांना अटक करून त्याचा कडे तपासा दरम्यान सावंत याच्या कडून लोखंडी हत्यार जप्त केले आहे.
सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा. पोलीस उपयुक्त परिमंडळ ५.विक्रांत देशमुख . सहा. पोलीस आयुक्त अश्र्विनी राख .हडपसर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे .यांच्या सुचणे नुसार सहा. पोलीस निरीक्षक समीर करपे.संदीप जोरे.पोलीस उपनिरिक्षक धनंजय गाडे .पोलीस अंमलदार दिनेश राणे.वैभव मोरे. सचिन बोराटे.दत्ता जाधव.स्वप्निल रासकर .सचिन पाटील. यांनी यशस्वी कारवाई केली आहे.
.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.