पुणे सोलापूर महामार्गावर पाटस येथील दुर्दैवी घटना : खासगी ट्रॅव्हल्सची बस थांबलेल्या ट्रकला धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर सोळाजण गंभीर रित्या जखमी

पुणे दिनांक २६ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे सोलापूर महामार्गावर रोडवर थांबलेल्या सिमेंटच्या ट्रकला खासगी ट्रॅव्हल्स बसने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सोळा प्रवासी हे किरकोळ रित्या.जखमी झाले आहेत त्यांना पाटस येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदरची घटना ही पहाटे साडेपाच वाजता घडली आहे.
दरम्यान सदर अपघात प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस ही उमारग्यावरुन पुण्याकडे येत असतांना पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस ही उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरात धडकली हा अपघात एवढा भीषण होता की बसचा कॅबीनचा चुराडा झाला आहे.दरम्यान बसचा टायर फुटल्याने सदरचा अपघात झाला आहे.ट्रक मधील सिमेंट हे रोडवर पडले आहे.या भीषण अपघातात बसच्या कॅबीन मधील दोघांचा मृत्यू झाला असून यातील एकूण सोळा प्रवासी हे किरकोळ रित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी पाटस येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.