Crime : मुंबईतून लोणावळ्याला वर्षा विहारा साठी आलेल्या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू

पुणे दिनांक ९.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)मुंबईतून लोणावळा येथे वर्षा विहारा साठी आलेल्या चौंघा पैकी दोंघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर एकीला पाण्यात बुडतांना त्यांचा अन्य एका साथीदार व स्थानिक नागरिकांनी वाचविले आहे. दगडांच्या खाणीत पोहतांना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडाले असे स्थानिकांनी सांगितले आहे.
पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोंघा जणांची नावे १ ) प्रियांका पानचंद व्होरा ( वय ३५.राहणार पवई मुंबई) व विजय सुभाष यादव ( वय ३५.राहणार घाटकोपर मुंबई)असे आहे. तर पाण्यात बुडतांना वाचविण्यात आलेल्या तरूणीचे नाव झेनिया वियागत ( वय २९.राहणार मुलूंड ठाणे ) असे आहे.
सदर घटने बद्दल लोणावळा पोलीस सूत्रांनी सांगितले की प्रियांका . विजय. झेनिया. व अभिजित असे चौघेजण हे मुंबईतून वर्षा विहारा करिता लोणावळ्याला आले होते. त्यांनी वरसोली भागात एक बंगला भाड्याने घेतला होता.
व सायंकाळी हे सर्वजण बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या एका दगडांच्या खाणीत पोहण्या करिता उतरले पण त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने त्यातील प्रियांका. व विजय हे दोघेजण पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. तर झेनिया हिला अभिजित व स्थानिकांनी पाण्यात बुडतांना वाचविले आहे. हे सर्वजण मुंबई मध्ये एका फायनान्स कंपनीत कामाला होते. सदर घटनेची माहिती पोलीसांना मिळाल्या नंतर पोलीसांनी त्यांना रूग्णालयात उपचारा करिता तातडीने दाखल केले पण डाॅक्टर यांनी दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अभिजित सावंत यांनी लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर पवार हे करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.