Arrested : पुणे रेल्वे स्टेशन येथे प्रवाशाला मारहाण करून लुटल्याप्रकरणी दोघेजण गजाआड

पुणे रेल्वे स्टेशन येथे पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास रिक्षाने प्रवास करणाऱ्या दोघा जणांना अन्य तिघा रिक्षा चालकांनी काठीने मारहाण करून त्यांच्याकडील ६ हजार रुपये लुटल्याऱ्यांना बंडगार्डन पोलिसांनी गजाआड केले आहे.
सदरच्या घटनेबाबत बंडगार्डन पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सोफियान अहमद ( वय ४३ रा. सय्यद राजा बरहानी उत्तर प्रदेश.) हे त्यांच्या अनेक जोडीदारासोबत पुणे टेशन येथून एका रिक्षावाल्याला ४५० रुपये भाडे ठरवून कुरकुम येथे जाण्या साठी निघाले असता आणि इतर तीन रिक्षा ड्रायव्हर यांनी त्यांची रिक्षा अडवून त्यांच्याकडील ६ हजार ६०० रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतले व त्यांना शिवीगाळ करून तसेच काठीने मारहाण करून अभी जादा कुछ बोला तो नहीं अशी धमकी दिली.
सदर घटने प्रकरणी सोफियान यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी रिक्षा चालक प्रदीप सिद्धेश्वर शिरसागर. ( वय ४०.) व सुजित बाळासाहेब लाटे. ( वय २८. दोघे रा.खराडी पुणे) व अन्य यांना अटक केली आहे याप्रकरणी पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.