Crime : हडपसर महमंद वाडीत सराईत गुन्हेगारांवर दोन राउंड फायर

पुणे दिनांक ६ जून ( पोलखोल नामा न्यूज टीम) हडपसर महमंद वाडीत सराईत गुन्हेगारांवर काल रात्रीच्य सुमारास दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने दोन राउंड फायर केल्या मुळे. सराईत गुन्हेगार गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सदरच्या घटने बाबत वानवडी पोलीस सूत्रांकडून दिलेली माहिती अशी की गोळीबारात जखमी झालेल्या सराईत गुन्हेगारांचे नाव पचीस उफ॔ फैजल रमजान शेख. ( वय २१.रा.सय्यद नगर कोंढवा .) असे आहे.पचीस हा रात्री महमंद वाडी गुलाम अली नगर येथून जात असतांना दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तींकडून त्याच्यावर दोन राउंड फायर करण्यात आले.त्यातील एक गोळी त्याच्या पोटावर लागल्या मुळे त्याला रूग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे.
या गोळीबार प्रकरणी स्थानिक नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात माहीती दिल्या नंतर पोलीसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गोळीबाराचा गुन्ह दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.