सिमेंटने भरलेल्या ट्रकची कार व दुचाकीला जोरात धडक : पुण्यातील नवले पुलाजवळ सिमेंटने भरलेल्या ट्रकचा अपघातात दोन गंभीर रित्या जखमी

पुणे दिनांक १४ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यातील नवले पुलाजवळ पून्हा एकदा आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सिमेंटने भरेलेल्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन ट्रकने एक कारला व दुचाकीला जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला असून या अपघात जखमी झालेल्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नवले पूलावर सतत अपघात होतात हे आता या भागातील लोकांना एक प्रकारची सवयच झाली आहे.आज देखील अशीच घटना घडली आहे.सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असते याचवेळी एका सिमेंटच्या ट्रकचे अचानक पणे ब्रेक फेल झाल्या मुळे या ट्रकच्या चालकांचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने या ट्रकने सिग्नल वर थांबलेल्या वाहनांना जोरात धडक दिल्याने या अपघातात एक कार व दुचाकीला जोरात धडक दिली.यात कारचे प्रचंड नुकसान झाले आहे तर दुचाकी ट्रकच्या खाली अडकली या अपघातात जखमी झालेल्या दोघांजणांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.या अपघातात सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही.अपघात ग्रस्त ट्रकला क्रेनच्या सह्हयाने बाजूला घेतले आहे.या अपघाता नंतर या मार्गावरील वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती.ती आता वाहतूक शाखेचे पोलिसांनी पूर्ववत केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.