अपघातातील जखमींवर शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू : मुंबई वरुन दसरा मेळाव्यातून परतणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या दोन एसटी बसला भीषण अपघात एकूण २५ जण गंभीर रित्या जखमी

पुणे दिनांक २५ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम). मुंबई मधील आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहून दोन एसटी बस मधून आपल्या गावाला परतणाऱ्या दोन एसटी महामंडळाच्या बसला पहाटे अपघात झाला असून या अपघातात एकूण २५ शिवसैनिक गंभीर रित्या जखमी झाले आहेत.या जखमींना तातडीने शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करीता दाखल करण्यात आले आहे. हे सर्व शिवसैनिक सिल्लोड येथील असल्याचे समजते.
दरम्यान या अपघात प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व शिवसैनिक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बस मधून मुंबई मधील आझाद मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहून आपल्या गावी सिल्लोड कडे येत असताना मुंबई ते नाशिक महामार्गावर शहापूर जवळ पहाटेच्या सुमारास ट्रकने एसटी बसला पाठीमागून जोरात धडक दिल्याने ही बस डिव्हायडरवर जाऊन जोरात आदळली व अपघात झाला.त्याचवेळी दुसरी एसटी बस ही शिवसैनिकांना घेऊन येणारी ती अपघात झालेल्या ट्रकवर जोरात धडकली व पुढे जाऊन उलटली या झालेल्या अपघातात एकूण २५ जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.यातील जखमी झालेल्या शिवसैनिकांवर शहापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.हे सर्व शिवसैनिक हे अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील असल्याचे समजते.दरम्यान काल पासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी जाणाऱ्या व परतणाऱ्या शिवसैनिकांच्या बस व कारला अपघात एकूण तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.