Ladder fell : गुजरात मध्ये शिडी घसरल्याने महाराष्ट्रातील दोन युवकांचा मृत्यू

गुजरात मधील सुरत शहरात एक दुर्दैवी घटना घडली असून सदरच्या घटनेत महाराष्ट्र मधील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. या युवकांच्या मृत्यूमुळे त्यांच्या गावावर व घरावर पूर्णपणे सुकाळा पसरली आहे.
या घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शिरुड गावचे हे युवक सुरत येथे लिप्सी दुरुस्ती करण्याकरिता गेले होते. व ते काम करीत असताना लिफ्टची दुरुस्ती ही सोहळ्या मजल्यावर करीत होते. याचवेळी उभी केलेल्या सीडीचा अचानक तोल जाऊन हे दोन्ही युवक सोहळ्या मजल्यावरून खाली पडले. त्यामुळे ते गंभीरित्या जखमी होऊन दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांची नावे निलेश प्रल्हाद पाटील व आकाश सुनील बोरसे अशी आहेत.
सदरची घटना सुरत येथील पांडेसरा भागात घडली आहे. या दोघांच्या मृत्यूमुळे त्या युवकांच्या शिरूड गावावर व त्यांच्या कुटुंबावर हा एक मोठा आघातच झाला असून गावावर शोककळा पसरली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.