५०० कोटींचा कथीत हाॅटेल घोटाळा प्रकरणी : उध्दव ठाकरे गटाचे रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स

पुणे दिनांक २० ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) उध्दव ठाकरे गटाचे नेते रविंद्र वायकर यांना मुंबई मधील आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने समन्स बजावण्यात आले आहे.वायकर यांना २३ ऑक्टोबर रोजी पोलिस मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे.५०० कोटींच्या कथीत हाॅटेल घोटाळा प्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे.दरम्यान चौकशी साठी आपण हजर राहणार आहे.असे वायकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई मधील जोगेश्वरी भूखंड व पंचतारांकित हॉटेल बाबत वायकर यांच्या वर सप्टेंबर महिन्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत वायकर यांनी न्यायालयातून यापूर्वी अटकपूर्व जामीन घेतला होता.दरम्यान मुंबई मधील जोगेश्वरी येथे महानगरपालिकेच्या राखीव भूखंडावर वायकर यांनी पंचतारांकित हॉटेल बांधले व त्यांबाबत त्यांनी महानगरपालिकाची परवानगी घेतली नव्हती व हा ५०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा दावा भाजप पक्षांचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोप करुन या बाबत तशी तक्रार केली होती.व नंतर वायकर यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने सप्टेंबर महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.