Crime : बुधवार पेठेत बेकायदेशीर रित्या पिस्तूल बाळगणारा अट्टल गुन्हेगाराच्या युनिट १ ने आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक १०.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान पोलीसां कडून गुन्हेगार चेकिंग चालू असतांना फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दत्तमंदीर जवळील बुधवार पेठेत रेकॉर्ड वरील गुन्हेगार हा वेश्या गमाना साठी आला असता पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. व त्यांच्या कडून एक ६० हजार रूपायांचे पिस्तूल असा मुद्देमाल जप्त केला आहे. व आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीसांनी मुसक्या आवळल्या आरोपीचे नाव. ओंकार राम प्रकाश अंभुरे ( वय २१ राहणार साक्षी अपार्टमेन्ट. तिसरा मजला. लेन नंबर १२ गारमाळ धायरी गाव पुणे)असे आहे. या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मिटींग घेऊन गुन्हेगारांवरकायद्याचा वचक बसविण्यासाठी गुन्हे शाखेकडून वारंवार रेकॉर्ड वरील आरोपीची चेकिंग तसेच पेट्रोलींग नेमण्यात आली होती. या आदेशा नुसार अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रामनाथ पोकळे. पोलीस उपयुक्त गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आऊट ऑपरेशन राबविण्यात आले होते.
गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद व त्यांचे पथक फरसखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत दत्तमंदीर जवळील बुधवार पेठेत रेकॉर्ड वरील गुन्हेगार आला असता पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे यांना त्यांच्या बातमी द्वारे बातमी मिळाली की सिंहगड रोड येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार ओंकार हा वेश्या गमाना साठी बुधवार पेठेत येणार आहे .त्या मुळे तिथे सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. व त्यांच्या विरोधात फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १२०/ २३ आर्म अॅक्ट ३ \ २५.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार व सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक .अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे. पोलीस उपयुक्त गुन्हे पुणे शहर अमोल झेंडे. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल तांबे. यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सैय्यद सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर. पोलीस उपनिरिक्षक सुनिल कुलकर्णी. अजय जाधव. पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे. राहूल मखरे. अमोल पवार. शशिकांत दरेकर. विठ्ठल साळुंखे महेश बामगुडे. अभिनव लडकत. यांच्या पथकाने केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.