Crime : ' मनोहर भिडेंना अटक केल्या शिवाय विरोधक शांत बसणार नाहीत ? '

पुणे दिनांक २९ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) शिवप्रतिस्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी महात्मा गांधीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात आता राज्यभरात विरोधी पक्षाचे नेते आता संतप्त झाले असून ते आता रस्त्यावर उतरले आहेत. आज राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत. भिडेंना येत्या २४ तासात अटक करा .अथवा अधिक तीव्रपणे आंदोलने करू.असा इशाराच विरोधकांनी दिला आहे. त्या मुळे बेताल व्यक्तव्य करण्यां भिडें यांच्या विरोधात कारवाई होणार का ? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज पुणे येथे देखील भिडें यांच्या विरोधात काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांनी आंदोलने केली आहेत.या बाबत काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी देखील भिडें यांच्या अटकेची मागणी केली आहे. या वेळी ठाकूर म्हणाल्या " समाजात अशांतता निर्माण करण्याचे काम संभाजी भिडें का करीत आहेत. अशी वक्तव्य करूनही त्यांच्या वर कारवाई का केली जात नाही? संभाजी भिडें यांना एवढी मुभा का आहे ? त्यांना २४ तासात अटक झाली पाहिजे, नाही तर अधीक तीव्रपणे आंदोलने करू "
या बाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडें च्या अटकेची मागणी विधान सभेत केली होती. या वेळी चव्हाण म्हणाले. " संभाजी भिडेंना या गृहस्थाने महात्मा गांधी बाबत अंत्यत वादग्रस्त विधान केलेले आहे. त्या मुळे समाजात तेढ निर्माण करण्या-यां अशा व्यक्तीला अटक करून. त्यांच्यावर कलम १५३ अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे. भिडें मागील अनेक वर्षांपासून समाजात तेढ निर्माण करण्याचा काम करीत आहेत. "
दरम्यान अमरावती मध्ये एका कार्यक्रमात बोलत असतांना संभाजी भिडें गांधी बाबत वादग्रस्त विधान केले होते. संभाजी भिडें.निशांदसिंह जोध.अविनाश जोध.व कार्यक्रमाच्या आयोजकांवर विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १५३ ( ३ ) .५००.५०५.( २).३४ या कलमा अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महापुरूषांविरोधात वादग्रस्त वक्तव्ये करणे.समाजात असंतोष पसरवणे .समाजातील विविध घटकांमध्ये तेढ घालणे.असे गुन्हे भिडें यांच्या वर नोंदवले गेले आहेत
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.