Crime : पुण्यातील नॅशनल डिफेंन्स अकॅडमी उडवून देण्याची धमकी देणा-यांच्या उत्तम नगर पोलीसांनी आवळल्या मुसक्या

पुणे दिनांक २१(पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)वडिलांनी व सास-यांने मानसिक त्रास दिल्यांने त्यांना अडकविण्यासाठी एकाने पुण्यातील खडकवासला येथील नॅशनल डिफेंन्स अकॅडमी ( NDA) उडवून टाकण्याची धमकीच दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. धमकी देणा-या व्यक्तीचे नाव अमोल महादेव वाघ ( वय ३३ राहणार इंदिरा वसाहत उत्तम नगर पुणे ) असे आहे.
दरम्यान या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाघ यांने पोलीस नियंत्रण कक्षातील ११२.या नंबर वर गुरूवारी सांयकाळी फोन करून पुणे व अहमदनगर येथे प्रत्येकी तीन ठिकाणी ब्लास्ट करणार आहे. आपणाकडे मशीनगन व आरडीएक्स असल्याची माहिती त्यांने दिली .त्यातील दोघे एनडीए मध्ये ब्लास्ट करणार आहे. असे सांगून त्यांचे मोबाईल फोन देखील देण्यात आले. ही माहिती दिल्या नंतर पुणे शहर पोलीस दल हे अलर्ट झाले. व याची माहिती उत्तम नगर पोलीस यांना देखील अलर्ट केले .उत्तम नगर पोलीसांनी त्वरित एनडीए येथे जावून तेथील लेफ्टनंट कर्नल थापा .कर्नल पांडे .व मेजर ठोंबरे यांना या बाबत माहिती देण्यात आली. त्या नंतर एनडीए ची संरक्षण यंत्रणा सतर्क झाली.
दरम्यान हा फोन कोणी केला. याची माहिती घेतली जात होती. तपासी अंती असे कळाले की नियंत्रण कक्षात फोन हा अमोल वाघ यांने केला आहे. समजल्यावर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत .पोलीसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर समजले की त्यांने दारूच्या नशेत हा फोन केला तो बिगारी काम व ड्रायव्हर म्हणून काम करतो .त्याच्या वडिलांनी जमीन विकली व याला काहीही पैसे दिले नाहीत. व वडील आणी सास-यांने मानसिक त्रास दिला म्हणून त्याच्या रागातून त्यांना अडकविण्यासाठी त्यांने हा फोन केल्याचे निष्पन्न झाले असून पोलीसांनी त्याच्यामुसक्या आवळल्या आहेत .
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.