Crime : लाचखोर अधिष्ठता यांच्या कार्यालयाची तोडफोड ; मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

पुणे दिनांक १० ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन टीम) पुण्यातील वैद्यकीय महाविद्यालयत लाचखोर अधिष्ठता यांच्या कार्यालयाची तोडफोड मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी काल केली होती.पंरतु याबाबतीत आज पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान व्ववस्थापण कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी.पुणे म.ना.पा.च्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक करण्यात आली होती.मनसेच्या कार्यकर्त्यां यांनी आंदोलन करुन अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती.सदरच्या तोडफोड मध्ये दोन कम्प्युटर व खुर्च्यांचे नुकसान झाले होते.त्यामुळे मनसेच्या आशिष साबळे.प्रशांत कनोजिया.धनंजय गवळी.व इतर ५ ते ६ कार्यकर्ते . यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.