Pune Crime : सोडचिठ्ठी दिली नाही म्हणून अंतर जातीय विवाह करणाऱ्या युवतीचा धर्मांतराचा बळी

पत्नी सोडचिठ्ठी देत नाही. तसेच बुरखा घालत नाही. मुस्लिम धर्म पाळत नाही. इत्यादी कारणावरून आंतरजातीय विवाह केलेल्या हिंदू तरुणीचा धारदार शस्त्राने वार करून खून. धर्मातरांचा बळी याप्रकरणी एकास अटक.
सदरच्या खूना बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रूपाली नावाच्या एका हिंदू तरुणीने मुस्लिम समाजाच्या इक्बाल यांच्या बरोबर आंतरजातीय विवाह केला होता. तरुणीच्या घरातून या विवाहासाठी विरोध असताना देखील तिने इकबाल याच्याबरोबर पळून जाऊन विवाह केला होता.
नंतर रूपाली ही हिंदू असताना देखील तिचे नाव जारा असे ठेवले होते. तसेच ती मुस्लिम धर्म पाळत नाही बुरखा घालत नाही.आदी कारणांनी तिचा छळ करुन इक्बाल हा तिला सोडचिठ्ठी मागत होता. रूपालीने सोडचिठ्ठी न दिल्यामुळे त्यांने काल रात्री साडेदहाच्या सुमारास तिच्या बरोबर भांडण काढून धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिचा खून केला व तेथून पळून गेला. सदर खुनाची घटना चेंबूर येथे घडली आहे.
खून झालेल्या २० वर्षीय युवतीचे नाव रुपाली उर्फ जारा इक्बाल शेख ( वय २०. रा. राहुल नगर प्रगती चाळ चेंबूर) असे आहे.खूनाच्या आरोपावरून पोलिसांनी इकबाल मोहम्मद शेख.( वय.३७. रा.चेंबुर.) याला टिळक नगर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.