Crime : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी विदर्भवाद्यांचा मोर्चा; संतप्त आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

पुणे दिनांक ९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या नागपूर मधील निवासस्थाना बाहेर आज मोर्चा काढण्यात आला होता.ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त विद्रर्भवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.अन्न धान्यावरील ' जीएसटी ' सह विविध मागण्यांसंदर्भात विद्रर्भवादी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत.फडणवीसांच्या निवासस्थाना बाहेर विद्रर्भवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्याने पोलिसांनी निवासस्थाना बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.यात संतप्त झालेल्या काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दरम्यान वेगळ्या विदर्भ राज्याची आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.तसेच या बरोबरच वीज दरात घट द्यावी व अन्न धान्यावरील जीएसटीच्या विरोधात विदर्भवादी कार्यकर्तेनी सुरूवातीला ' लाॅगमार्च ' काढला व नंतर फडणवीस यांच्या निवासस्थानाकडे जात होते.पोलिसांनी त्यांना अडविण्यांचा प्रयत्न केला त्यामुळे काही काळ पोलिस व आंदोलक यांच्यात तणाव निर्माण झाला या वेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सूत्रांन द्वारे माहिती मिळत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.