Crime manipur : मणिपूर मध्ये हिंसाचार चालूच; अज्ञातांने तीन घरे दिली पेटवून

पुणे दिनांक २८ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम ) मणिपूर मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार चालूच आहे.व शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत हे आजच्या घटनेवरून दिसून येत आहे.आद्याप प्रर्यत मणिपूर धगधगत आहे.सूत्राच्या माहितीनुसार रविवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तीन घरे पेटवून दिली.ही घटना मणिपूर मधील न्यू लंबुलेन भागात ही घटना घडली आहे.घरे पेटवून दिल्यानंतर या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्या मुळे सुरक्षा दलाच्या जवानांना हवेत गोळीबार करावा लागला.व जमावाला घटना स्थळावरुन पांगविण्यासाठी साठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आहेत.अशी माहिती पोलिस अधिकारी यांच्या कडून मिळत आहे.
दरम्यान अशीच दुसरी घटना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांकडून तीन शस्त्र अज्ञात व्यक्तीने हिसकावुन घेतल्याची घटना आहे.हा सुरक्षा रक्षक कर्मचारी कुंटुब कल्याण विभागाच्या माजी संचालक के राजो यांच्या यांच्या निवासस्थानी कर्तव्यार होता.अशी माहिती पोलिस सूत्रांनच्या द्वारे मिळत आहे.सदरची घटना ही इंफाळच्या पश्चिमेच्या जिल्ह्यात घडली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.