लंडनच्या पाहुण्यांची जेल प्रशासनाकडून चोख व्यवस्था : 'आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीला व्हीआयपी सर्व सुविधायुक्त बॅरेक, संजय राऊत?

पुणे दिनांक ८नोव्होंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आर्थर रोड कारागृहात निरव मोदीला व्हीआयपी असं बॅरेक असल्यांचा दावा उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.राऊत यांनी दैनिक सामनाच्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात हे आर्टिकल लिहिले आहे.दरम्यान तुरुंगात अनुभवलेले त्यांना आलेला अनुभवाचा यात समावेश आहे.
दरम्यान आर्थर रोड तुरुंगात निरव मोदींच्या बॅरेक मध्ये सर्व खास सुविधा होती त्याचा बॅरेकच्या शेजारी मी होतो.असा दावाच राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात लिहिलेल्या आर्टिकल मध्ये केला आहे.दरम्यान आर्थर रोड तुरुंगात ज्या बॅरेक होत्या त्याच्याच बाजूला ही व्हीआयपी बॅरेक बनवून घेतली होती.आणि याची रोज साफसफाई करून त्याचे व्हिडिओ शूट केले जात होते.तसेच लंडनवरुन एक पाहुणा आलाच तर त्यांच्यासाठी ही वेगळी व्यवस्था असं सांगण्यात आलं होतं.हा व्हीआयपी पाहुणा म्हणजे निरव मोदी, असं राऊत यांनी म्हटले आहे.दरम्यान निरव मोदी हा लंडनच्या तुरुंगात आहे.व मला मुंबईला पाठवू नये अशी मागणी त्यांने न्यायालयात केली आहे.कारण भारतातील तुरुंग व्यवस्था अमानवी स्वरूपाच्या आहेत.त्यामुळे कमालीची अस्वस्थता व त्यांना छळ छावण्याचे स्वरूप आहे.त्यामुळे मला लंडन तुरुंगात ठेवा .या याचिकेनंतर लंडन न्यायालयाने आर्थर रोड तुरुंग प्रशासनाकडून येथील तुरंग व्यवस्थेचा अहवाल मागवला.
दरम्यान त्यामध्ये निरव मोदी साठी व्हीआयपी निर्माण केलेल्या खास कोठडीचे चित्रण पाठवले आहे.ही कोटी प्रशस्त असून यात स्वतंत्र टिव्ही व बाथरूमचा समावेश आहे.ही सुविधा इतर कैद्यांच्या नशिबी नाही.आर्थर रोड येथे बनविलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डात मी आहे.निरव मोदी आला तर आपलेला कंपनी मिळेल असं मला वाटले होते.असं देखील राऊत यांनी यात म्हटले आहे.राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात हे आर्टिकल लिहिलेले आहे.तुरूगांत अनुभवलेले अनुभव यात आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.