मुंबई मध्ये गणपती विसर्जन दरम्यान दुर्घटना : मुंबईतील जुहू चौपाटी येथे वीज कोसाळून स्वयंसेवकांचा मृत्यू

पुणे दिनांक २८ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र आपल्या लाडक्या गणेश बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वत्र धामधूम सुरू असताना मात्र याच दरम्यान मुंबई मध्ये विसर्जन वेळी एक मोठी दुर्घटना झाली आहे.जुहू समुद्र किनाऱ्यावर गणपती विसर्जना करीता तैनात असणाऱ्या स्वयंसेवाकांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत विसर्जन सुरू आहे.व तसेच ☁️ ढगांच्या गडगडाटासह व विजांच्या कडकडाटात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे.या मुसाळधार पाऊसा मध्ये आपल्या लाडक्या गणेश बाप्पाचे विसर्जन सुरू आहे.व याच दरम्यान वीज पडून दुर्घटना झाली आहे.
दरम्यान मुंबई मधील जुहू चौपाटी वर वीज कोसळली आहे व ही घटना घडली आहे.ही वीज जुहू चौपाटीवर विसर्जन साठी तैनात असलेल्या स्वयंसेवकावर पडली त्यानंतर स्वयंसेवकाला तातडीने महानगरपालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारा पूर्वीच या युवकाचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती कुपर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे.या घटने मुळे युवकाच्या कुंटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.