Crime : वानवडी पोलीसांनी १६.गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले सुपूर्त

पुणे दिनांक १०.( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रवासा दरम्यान विविध ठिकाणावरून मोबाईल हॅडसेट गहाळ झाल्या बाबत वानवडी पोलीस स्टेशनयेथे ऑनलाईन तक्रारी तसेच सी ई आर. आर. या पोर्टल वर तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. सदर गहाळ झालेले मोबाईल हॅडसेट चे आय एम ई.आय. नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून हरवलेले मोबाईल वापरत असलेल्या लोकांना संपर्क करून २ लाख २० हजार रूपायांचे एकूण १६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले आहे.
दरम्यान हस्तगत केलेले मोबाईल फोन हे संबधित तक्रार दारांना परत देण्यात आले आहे. हरवलेले मोबाईल फोन परत मिळाल्यांने तक्रारदार यांनी आनंद व्यक्त केला आहे. व पोलीसांचेआभार मानले आहेत. मोबाईल हरवल्या नंतर त्यांची तक्रार पुणे पोलीस वेबसाईटवरील लाॅस्ट अॅण्ड फाऊंट वर तसेच शासनाचे CEIR .या पोर्टवर तात्काळ नोंद करावी असे आवाहन पुणे पोलीसा मार्फत केले आहे. सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार. पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक.अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा. पोलीस उपयुक्त परिमंडळ ५.पुणे शहर विक्रांतदेशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे. व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे. सायबर तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक सोनालिका साठे. पोलीस हवालदार अतुल गायकवाड.,राहुल गोसावी. विष्णू सुतार. विठ्ठल चोरमले .अमोल गायकवाड. निळकंठ राठोड. सुजाता फुलसुंदर. सोनाली वाकसे. यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.