Crime : ऑनलाईन बायको शोधायला गेला .आणी कोट्यावधीचा गंडा घालून घेतला ? आणि तोंड लपविण्यांची वेळ आली .

पुणे दिनांक ३१ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम ) एका ब्रिटन मधील साॅप्टवेआर अंभियंता बरोबर फसवणूकीची घटना नव्याने समोर आलीआहे. या अंभियंताला एका महिलांने लग्नांचे आमीष दाखवून त्या अंभियंताला १.१ कोटींच्या पेक्षा जास्त पैसै उकळून गंडवले आहे. एका विवाह नोंदणी साईटवर या अंभियंताने नाव नोंदणी केली होती. या तरूणीने विवस्त्र होत व्हिडिओ काॅल केला आणी त्याद्वारेपैसे उकळले आहेत.
सदरच्या घटने बाबत सूत्रांनच्या द्वारे मिळालेली माहिती अशी की व्हाईटफिल्ड सीईएन गुन्हे पोलिसांना महिलेच्या खात्या मधील ८४ लाख रूपये परत मिळविले आहेत फसवणूक झालेली व्यक्ती ही ४१ वर्षीची आहे .तो केअर पुरमचा रहिवासी आहे .तो कामा साठी बेंगळुरूला प्रशिक्षणासाठी आला होता. या व्यक्तीला विवाह करावयाचा होता. त्यामुळे त्यांने विवाह वेबसाईटवर नोंदणी केली होती. या साईटवर बनावट प्रोफाईल असलेल्या एका महिलेने याच साईटवर या व्यक्तीबरोबर मैत्री केली . काही दिवस मेसेजद्वारे दोघांचे बोलणे पण झाले. त्यानंतर दोंघाणी आपला मोबाईल नंबर एकमेकांना दिला होता.
दरम्यानच्या वेळी या महिलांने या व्यक्ती बरोबर विवाह करावयाची सहमती दाखविली .तसेच माझ्या वडिलांचे निधन झाले आहे.मी आई समावेत राहते असे सांगून २ जुलै रोजी या तरुणीने काॅल केला होता. माझी आई आजारी आहे तिच्या औषधे साठी पैसे हावेत असे तिने या व्यक्तीला सांगितले. आईच्या उपचारासाठी फसवणूक झालेल्या व्यक्तीने १ हजार ५०० रूपये दिले. त्या नंतर दिनांक ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता व्हिडिओ काॅल केला.त्यावेळी काॅलवर बोलतांना तिने स्वताचे कपडे काढले आणी नकळत तो काॅल रेकॉर्ड केला.
व नंतर तिने हि क्लिप त्याला पाठविली इतकेच नाही तर या तरूणीने या व्यक्तीच्या पालकासोबत देखील ही व्हिडिओ क्लिप शेअर करण्याची धमकी दिली. या बदल्यात आपल्या बॅंक खात्यात १ कोटी १४ लाख रूपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. या बाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात या व्यक्तीने पोलिस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.