Accused arrested : खुन करण्याचा प्रयत्न करून,गंभीर जखमी करून फरार झालेला आरोपी अखेर जेरबंद

१३ ऑक्टोबर २०२२ रोजी फिर्यादी मयुर चव्हाण,पुणे यांना आरोपींनी खुन करण्याचे उद्देशाने त्यांचेवर कोयत्याने वार केला असता,सदरचा वार हुकवून ते पळुन जात असताना,त्यांना सिमेन्टचा ब्लॉक फेकून मारून जखमी केले होते.
२१ ऑक्टोबर २०२२ रोजी दिपावली सणाचे अनुशंगाने गुन्हे शाखा युनिट-1 चे अधिकारी व अंमलदार हे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग करत असताना,पोलीस अंमलदार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की, नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी दिपक परदेशी हा वैकुंठ स्मशानभुमी नवी पेठ,पुणे येथे मित्रास भेटण्यास येणार आहे.
सदरची खबर प्राप्त होताच युनिट-1 चे अधिकारी व अंमलदार हे वैकुंठ स्मशानभुमी नवी पेठ,पुणे येथे सापळा रचुन पाहीजे आरोपीत नामे दिपक सुभेदार परदेशी,वय-22 वर्षे,रा.55/56, सदानंदनगर,सोमवार पेठ,पुणे यास ताब्यात घेवुन, पुढील कार्यवाहीसाठी समर्थ पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आला आहे.
सदर आरोपी यांचेविरूध्द खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्यार बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल असून,तो समर्थ पोलीस ठाणे कडील गुरनं.182/2022,भादंवि कलम 386,34,फौजदारी सुधारणा कायदा कलम 7 या गुन्हयामध्ये सुध्दा पाहीजे आरोपी आहे. सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त, श्री.संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप-आयुक्त,गुन्हे, श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-1,श्री.गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट-1,गुन्हे शाखा,पुणे शहरचे पोलीस निरीक्षक,श्री.संदीप भोसले, सहा.पो.निरी.कवठेकर, पोलीस अंमलदार,अय्याज दड्डीकर, निलेश साबळे, इंम्रान शेख, महेश बामगुडे, अजय थोरात, अमोल पवार व तुषार माळवदकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.