Wife committees suicide because her husband blocked her on WhatsApp : नवऱ्याने व्हाट्सअँप वर ब्लॉक केलं म्हणून बायकोने केली आत्महत्या?

व्हॉट्सअपवरून पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने व्हॉट्सअपवर ब्लॉक केल्यानंतर मानसिक दडपणाखाली येत २२ वर्षीय पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर परिसरात ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अविनाश कुरेवार विरोधात आत्महत्येस प्रवूत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, २२ वर्षीय तरुणी ही मूळची यवतमाळची आहे. काही महिन्यांपूर्वी तिने घरच्यांना न सांगता अविनाशशी लग्न केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आपली पत्नी दुसऱ्या कुठल्या तरी मुलासोबत बोलते, फिरते असा संशय अविनाश घेत होता.
यावरून अविनाशने पत्नीला शिवीगाळ तसेच मारहाणही केली होती. तसेच त्याने पत्नीला व्हॉटस्अपवर पत्नीला ब्लॉकदेखील केले होते. अविनाशच्या याच नेहमीच्या जाचाला कंटाळून अविनाशच्या पत्नीने घरात गळफास घेत आत्महत्या केली.
अविनाश आणि त्याची पत्नी कात्रज परिसरातील संतोषनगर भागात भाड्याने राहात होते. पतीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून अखेर अविनाशच्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली.
ही घटना ही सगळी घटना ८ जानेवारी रोजी घडली असून, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भारतीय दंडात्मक कलम ३०६, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांना या दोघांच्या लग्नाचे पुरावे मिळालेले नाहीत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.