Crime : फोटो व्हायरल करण्यांची व मुलाला मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार

पुणे दिनांक २७ ( पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) व्यवसायच्या माध्यमातून महिला बरोबर ओळख वाढवून महिलेचे फोटो काढून सदरचा फोटो व्हायरल करण्यांची धमकी देउन त्या महिलेवर बलात्कार करून पैसे घेतल्या प्रकरणी संबंधित महिलांने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या नंतर पोलिसांनी एका विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव सूरज राजेभाऊ सावंत ( सध्या रा.शिक्रापूर. मुळ रा.शिंदखेडा जि.धुळे) असे आहे .या घटने बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार. सूरज याची व्यवसायच्या माध्यमातून महिला बरोबर ओळख झाली होती. तो महिलाच्या घरी आला त्या वेळी महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत जवळीक निर्माण करून फोटो काढले व नंतर फोटो व्हायरल करण्यांची धमकी देउन व मुलाला मारण्याची धमकी देत अत्याचार केला.
दरम्यान या प्रकरणी भयभीत झाल्याने महिलांने कोणाला काही सांगितले नाही. परंतु काही दिवसांनी तो परत महिलाच्या घरी आला व महिलेला धमकी देत पुन्हा अत्याचार केला. व्हिडिओ काढला व महिलेचे फोटो व व्हिडिओ तिच्या पतीला पाठविण्याची धमकी देत तिच्या कडून पैसे घेउन गेला .
याच्या त्रासाला कंटाळून ही महिला तिच्या वडिलांच्या घरी गेली .पण तिथे देखील फोन करून हा त्रास देत होता. याच्या सततच्या फोनला वैतागून महिला ने ' तुला काय करायचंय ते कर ' म्हणल्यावर त्यांने महिलेच्या पतीला काही मेसेज केले. त्या नंतर या महिलांने घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला व नंतर शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली .त्या फिर्यादी नंतर पोलिसांनी आरोपी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. व पुढील तपास शिक्रापूर पोलिस करीत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.