Arrested : मोलकरीण म्हणुन घरकाम करण्याचे बहाण्याने घरातील देवीची चांदीची मुर्ती व चांदीच्या दागिन्यांची चोरी करणा-या महिलेस 24 तासात जेरबंद

देवपुजा करीत असताना देवघरातील अंबामातेची चांदीची मुर्ती,चांदीचा हार,चांदीचे निरंजन,छोटी वाटी असे दिसुन न आल्याने त्यांना त्यांचे घरात दोन दिवसापुर्वी कामास लागलेली मोलकरीण महिला हीने चोरी केलेबाबत संशय आल्याने, फिर्यादी यांनी मोलकरीण महिला हीचे विरुध्द कोरेगाव पार्क पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केलेला आहे.
दाखल गुन्हयाचा तपास डि.बी.पथकाचे प्रभारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक,दत्तात्रय लिगाडे व पोलीस अंमलदार, विवेक जाधव व प्रविण पडवळ यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,एक अनोळखी महिला ही साऊथमेन रोड कोरेगाव पार्क,पुणे येथे थांबली असुन,ती बंगल्याची पहाणी करत असलेबाबत माहिती मिळाल्याने,लागलीच तपास पथकातील स्टाफ व महिला पोलीस अंमलदार यांचेसह साऊथमेन रोडला बंगल्याची पहाणी करत थांबलेल्या महिलेस तीचे नाव पत्ता विचारता तीने सुरुवातीस उडवा-उडीवीची उत्तरे दिल्याने तीस ताब्यात घेवुन,तीचेकडे अधिक चौकशी केली असता,तीने फिर्यादी यांचे घरी काम करीत असताना चोरी केले असल्याचे कबुल करुन चोरी केलेले एकुण 65000/- रु किंमतीची व अंबामातेची चांदीची मुर्ती,चांदीचा हार,चांदीचे निरंजन व छोटी वाटी अशा चांदीच्या एकुण (1 किलो 55 ग्रॅम वजनाच्या) चोरीस गेलेल्या सर्व वस्तु हस्तगत करुन,सदरचा गुन्हा 24 तासात उघडीस आणलेला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही श्री.अमिताभ गुप्ता,पोलीस आयुक्त,पुणे शहर, श्री. राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त,(पश्चिम),पुणे शहर, श्रीमती.स्मार्तना पाटील,मा.पोलीस उप आयुक्त,परि-2,पुणे शहर, श्री.आर.एन.राजे,सहा पोलीस आयुक्त,लष्कर विभाग,पुणे, श्री.विनायक वेताळ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोरेगाव पार्क,पोलीस ठाणे पुणे शहर,श्रीमती.दिपाली भुजबळ, (गुन्हे), कोरेगाव पार्क पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा.पो.निरी.दत्तात्रय लिगाडे, सपोफौ.नामदेव खिलारे, पोलीस अंमलदार,रमजान शेख, विजय सावंत, विवेक जाधव, प्रविण पडवळ, महिला पोलीस अंमलदार, ज्योती राऊत व वैशाली माकर यांनी केली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.