Crime : बसची वाट पाहणा-यां महिलांनी भलघाव कारने चिरडले .तीन महिलांचा मृत्यू तीन गंभीर

पुणे दिनांक १६ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) सहा मासे विकणां-या महिला या बस स्टॉप वर बसची वाट बघत थांबल्या होत्या. त्याच दरम्यान चेन्नई वरून पुद्दुचेरीला जाणां-या एका भरघाव वेगाने कारने त्यांना चिरडले .चेन्नईतील कोट्टकपुरम जवळील किलपुथुपट्टू येथे एक मोठा रोड अपघात झाला आहे. या अपघातात तीन महिलांना कारने चिरडले आहे. या महिला मासे विकणां-या होत्या .
अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे १) लक्ष्मी ( वय ४८ ) २ ) गोविंदम्मल (वय ४७ ) ३ ) गेंगम्मल ( वय ४५ ) अशी आहेत. या सर्व महिला पुद्दुकुप्पम येथील राहाणां-या आहेत. त्या नियमित किलपुथुपट्टू येथे मासे विक्रीसाठी येतात .पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा महिला मासे विकणां-या बसची वाट बघत थांबल्या होत्या. तेव्हा चेन्नई वरून पुद्दुचेरीला जाणां-या एका भरघाव वेगाने कारने त्यांना चिरडले आहे. सहा पैकी तीन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर तीन महिला जखमी झाल्या आहेत. १) हेमला .२ ) प्रेमा ३) नायगम .या जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारा करिता पाॅडिचेरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस ( पी आय एम एस ) मध्ये दाखल करण्यात आले आहे. कार मधील चौंघा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी चेन्नई मधील नुंगमबक्कम येथील कक्कन काॅलनीतील जी.विघ्नेसरण ( वय २२ ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या विरोधात बेदारकारपणे वाहन चालविणे व अपघातास कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.