मराठा आरक्षण मुद्दा चांगलाच तापला : मराठा आरक्षण साठी तरुणांने उपोषण मंडपात विष घेऊन केला आत्महत्याचा प्रयत्न

पुणे दिनांक १३ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता तरूण चांगलेच आक्रमक झाले असून आता त्यांचे पाऊल हे निराशा पदरी पडत असल्याने हातबल होऊन आत्महत्या करत आहेत.काही तरुण आत्महत्या करण्याच प्रयत्न करत आहे .पण " गेंड्याच्या कातडी सारखे सरकार कासव गतीने कामकाज करत चाल ढकल करीत आहेत",
दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागील आठवड्यापासून यवतमाळ मध्ये बेमुदत उपोषण सुरु होते.याताच मंगळवारी एका तरुणाने अचानक पणे या ठिकाणी मंडपात येऊन सर्वांना पुढे विष प्राशन केले. दरम्यान याप्रकरणा मुळे सर्वांची एकच धावपळ उडाली व आत्महत्या करणाऱ्या तरुणांला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.आहे विष घेतलेल्या तरुणांचे नाव अशोक देवराम जाधव ( राहणार.जेवली .तालूका उमरखेड ) असे आहे.त्याच्यावर यवतमाळ मधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.सूत्रा द्वारे मिळालेल्या माहिती नुसार त्यांने कोराजेन नावाचे विषारी औषध प्राशन केले आहे.दरम्यान उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांनी कोणत्याही प्रकारचे धक्कादायक पाऊल उचलू नये असे आवाहन केले आहे.तसेच प्रशासनाच्या वतीने देखील तरुणांना याबाबत आवाहन केले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.