आंदोलंक आक्रमक कार पेटवली : मराठा आरक्षणासाठी युवकाची तलावात उडी घेऊन आत्महत्या... उमरगा बंद!

पुणे दिनांक ७ सप्टेंबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) धाराशिव जिल्ह्यातील उमरगा बंदची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.येथील तलावात मराठा समाजाच्या मागणीसाठी तीस वर्षीय युवक किसन माने यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी व गावकऱ्यांनी या भागात ठिक ठिकाणी आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी एक गाडी जाळण्यात आली आहे.
दरम्यान या तीस वर्षीय युवकाने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी तलावात आत्महत्या केलेल्या युवक किसन माने यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत आम्ही हा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त झालेल्या गावकऱ्यांचे म्हणनं आहे.यात संतप्त झालेल्या नागरिकांनी एक गाडी जाळण्यात आली आहे.सदर ठिकाणी पोलिसांनी कडक असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.या धाराशिवचे पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की आम्ही या भागात कडक असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सदरची गाडी ज्या आंदोलंकानी पेटवून दिले त्याचे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळाले आहे.आम्ही आंदोलन कर्त्यांना शांतता ठेवण्याची विनंती करत आहेत.असे ते म्हणाले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.