Kisses girl : झोमॅटो डिलिव्हरी बॉयने तरूणीचे कोंढव्यात जबरदस्तीने घेतले चक्क चुंबन डिलिव्हरी बॉय अटकेत

पुण्यात एक फॅशन बनली आहे. ऑनलाइन जेवणाची ऑर्डर द्यायची. हीच फॅशन एका तरुणीची च्या चांगलीच अंगलट आली आहे. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली असून झोमॅटो डिलिव्हरी बॉय ने चक्क जबरदस्तीने तरुणीचा चुंबन घेऊन तिचा विनयभंग केल्याची धक्का दायक घटना ही कोंढव्यात घडली आहे.असून आता या विनयभंगाच्या आरोपावरून डिलिव्हरी बॉयला अटक केली आहे.
जेवणाची ऑनलाईन ऑर्डर घेऊन हा झोमॅटो कंपनीचा डिलिव्हरी बॉय तरुणीच्या घरी आला व घरात तरुणी एकटीच असल्याचा फायदा घेत. जबरदस्तीने त्या तरुणीचे चक्क त्याने चुंबन घेतले. तरुणीने तात्काळ याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान या विनयभंगाच्या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. सदर युवती ने या कंपनीकडे ऑनलाइन जेवणाची ऑर्डर केली होती. ही ऑर्डर घेऊन झोमॅटो डिलिव्हरी बॉय येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीमध्ये शनिवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गेला होता. त्यावेळी त्यांने १९. वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतले. या मुलीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून. रईस शेख ( ४० ) याला अटक केली आहे.
सदरची १९ वर्षीय तरुणी ही येवले वाडी मधील एका नामांकित सोसायटीमध्ये राहते.शनिवारी शेख हा जेवणाची ऑर्डर घेऊन. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आला. त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर. सदर तरुणीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर थँक्यू म्हणण्याचा बहाना करून तरुणीचा हात हातात घेतला. त्यावेळी त्या तरुणीने हात सोडविण्याचा प्रयत्न केला असता. तिला जबरदस्तीने जवळ ओढून. तिचे चुंबन घेतले. याप्रकरणी तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर. पोलिसांनी तपास करून शेख या झोमॅटो डिलिव्हरी बॉयलर अटक केली. असून याप्रकरणी पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.