कामगारांसाठी अपघात विमा योजनेचा देखील समारंभ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत युपीआय सेवेचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सेवेचा शुभारंभ

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) राज्यांचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची युपीआय सेवा व पगारदार कर्मचारी यांच्या करीता अपघात विमा योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.बॅकेने नवे तंत्रज्ञानांचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा.योग्य नियोजन तसेच उत्तम आणि पारदर्शक कारभाराद्वारे ग्राहकांचे समाधान होईल असे काम करावे.असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान पगारदार कर्मचारी यांच्या करीता सुरू करण्यात आलेल्या अपघात विमा योजना मुळे त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळेल असे सांगून हे वीमा कवच ३० लाखांहून ५० लाख रुपयां प्रर्यत वाढविण्यासाठी संचालक मंडळांनी विचार करावा अशी सूचना त्यांनी यावेळी केली.दरम्यान यावेळी ते म्हणाले की बारामती नागरिकांमुळे मला या बॅकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली व सर्व सामान्यांच्या आर्थिक प्रगतीला हातभार लावता आला.बॅकेमुळे सर्वाचे भरभरून प्रेम मिळाले.त्यामुळे बॅकेशी निगडीत घटकांचा कायम ऋणी राहीन.अशा शब्दात त्यांनी यावेळी भावना व्यक्त केल्या.सदरच्या कार्यक्रमाला आमदार अशोक पवार. संजय जगताप.बॅकेचे अध्यक्ष दिंगंबर दुर्गाडे उपाध्यक्ष सुनील चांदेरे . रमेश थोरात.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुध्द देसाई.बॅकेचे संचालक मंडळांचे सदस्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.