पेटिएम करो.सायबर सेफ्टी फ्रेमवर्क मध्ये त्रुटी : रिझर्व्ह बँक ऑफइंडिया कडून पेटिएम पेमेंट्स बॅक लिमिटेडला तब्बल ५.३९ कोटी रुपयांचा ठोठावला दंड

पुणे दिनांक १३ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पेटिएम पेमेंट्स बॅक लिमिटेडला नो युवर कस्टमर निकाषांसह काही तरतुदीचं पालन न केल्याबद्दल ५.३९ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्वतः याबाबत माहिती दिली आहे. सायबर सेफ्टी फ्रेमवर्कशी संबंधित काही त्रुटी बॅकेमध्ये आढळून आल्या आहेत.
दरम्यान याप्रकरणी रिझर्व्ह बँकेला असं आढळून आलं की पेमेंट बॅकांचं लायसन्स देण्यासाठी आरबीआयच्या गाईडलाईन्स बॅकामधील सायबर सेफ्टी फ्रेमवर्क आणि UPI इकोसिस्टमसह मोबाईल बॅकिंग अॅप्लीकेशन सुरक्षित करण्याशी संबंधित काही तरतुदीचं पूर्णपणे पालन करण्यात येत न्व्हव्हत्या . त्यामध्ये काही उणिवा होत्या.ऑडिटर्सकडून पेटिएम पेमेंट्स बॅकेचं सर्वसमावेशक ऑडिट अधिकृत वक्तव्यानुसार बॅकेच्या KYC/ अॅटी मनी लाॅडरिंगच्या दुष्टीकोणातून विषेश तपासणी करण्यात आली आहे. आरबीआय कडून पेटिएम पेमेंट्स बॅकला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.यात बॅकेने पेंमेड ट्रांजेक्शनचं परीक्षण केलेलं नाही.व पेमेंट सर्विसेजचा फायदा घेत असलेल्या संस्थांच्या जोखिमीचं मूल्यांकनही केलेलं नाही. रिझर्व्ह बँकेने म्हटलं आहे की " Paytm"पेमेंट्स बॅकेनं पेमेंट सेवेचा लाभ घेत असलेल्या काही ग्राहकांच्या आगाऊ खात्यांमध्ये दिवसांच्या शेवटच्या शिल्लक रक्कमेच्या नियामक मर्यादेचं उल्लंघन केलेलं आहे " यानंतर बॅकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.दरम्यान यानंतर पेटिएम पेमेंट्स बॅकेकडून उत्तर मिळाल्यानंतर आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन न केल्याबद्दल बॅकएवरईल आरोप सिद्ध झाला.त्यानंतर पेटिएम पेमेंट्स बॅकेवर आर्थिक दंड ठोठावण्यात आला आहे.तसेच रिझर्व्ह बँकेने केलेल्या कारवाईमुळे पेटिएम वापरणाऱ्या ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.असे. आरबीआयच्या वतीने कळविण्यात आले आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.