रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया : कर्जाचे व्याजदर ठरविण्यांचा अधिकार ग्राहकांना उपलब्ध करून द्या आरबीआय

पुणे दिनांक १९ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) कर्जाच्या हप्त्यात एक विशिष्ट प्रकारचा त्यावरील वाटा हा व्याजदराचा असतो.पण बरऱ्यांच वेळा व्याजदर वाढलाकी कर्जाचा मासिक हप्ता मध्ये देखील वाढ पण कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना याबाबत कोणतीही सुचना दिली जात नाही.व याबाबत त्यांची सहमती देखील घेतली जात नाही.आता या प्रकरणावर नियंत्रण आणण्यांचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आला आहे.
बॅक व कर्ज देणाऱ्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या मनमानी कारभारा बाबत आळा घालण्यासाठी आता आरबीआयच्या वतीने आदेश जारी करण्यात आले असून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना व्याज दरांची संपूर्ण कल्पना देणं आता अनिर्वाय असेल असं आरबीआयच्या वतीने त्या आदेशात म्हटले आहे.जेव्हा जेव्हा व्याजदर वाढवले जातील तेव्हा व्याजाची योग्य रक्कम निवडण्यासाठी बॅकेने किंवा खासगी वित्त संस्थांकडून ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून द्यायला पाहिजे.कर्जाच्या मंजुरी वेळीच बॅकांनी व खासगी वित्त क्षेत्रातील कंपन्यांनी ग्राहकांना व्याजदरातील बद्दलाचा कर्जाच्या हप्त्यांवर होणाऱ्या परिणामांची पूर्व कल्पना द्यायला पाहिजे.तसेच हप्ता किंवा मुदतवाढीसंदर्भातील सर्व सुचना योग्य पध्दतीने तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात यावी असे आरबीआयच्या वतीने कळविण्यात आले आहे .
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.