Bogus school in Pune : पुण्यामध्ये ४३ शाळा बोगस, पाहा बोगस शाळांची यादी

पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.एक-दोन नव्हे तर तब्बल ४३ शाळा पुणे जिल्ह्यामध्ये बोगस आढळल्या आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केलेल्या पडताळणीमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. या ४३ पैकी ३० शाळा कायमच्या बंद करण्यात येत आहेत.
खालील शाळांवर कारवाई
- ऑर्चीड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगाव बुद्रुक, तालुका हवेली
- पुणे इंटरनॅशनल स्कूल, आष्टापुर मळा, लोणी काळभोर, तालुका हवेली
- श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल वीर, तालुका पुरंदर (परस्पर स्थलांतर)
- संकल्प व्हॅली स्कूल, उरवडे, तालुका मुळशी
- एस. एन. बी. पी. टेक्नो स्कूल, बावधन, तालुका मुळशी
- राहुल इंटरनॅशनल स्कूल, हिंजवडी, तालुका मुळशी
- अंकुर इंग्लिश स्कूल, जांभे/ सांगावडे, तालुका मुळशी
- श्री साई बालाजी पब्लिक स्कूल, दत्तवाडी नेरे, तालुका मुळशी
- श्री. मंगेश इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, अशोकनगर, लिंगाळी रोड, तालुका दौंड (परस्पर स्थलांतर)
- क्रेयॉन्स इंग्लिश स्कूल कासूर्डी, तालुका दौंड
- किडझी स्कूल, शालिमार चौक, दौंड
- सुलोचना ताई झेंडे बालविकास व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी, तालुका हवेली.
- तक्षशीला विक्रमशिला इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल, किरकटवाडी, तालुका हवेली.
या शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीवर कारवाई होणार आहे. पुण्याताली ग्रामीण भागातील शाळांचा बोगसपणा उघड झालाय.
याशिवाय ज्या 30 शाळा अनधिकृतरित्या सुरू होत्या, त्या शाळा बंद झाल्या आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांनी दिला आहे. त्यापैकी काही शाळा मूळ परवानगी ठिकाण सोडून अन्यत्र भरत होत्या. आता त्या मूळ पत्त्यावर भरत आहेत. तसेच इतर शाळांना शासनाची परवानगी / मान्यता नसल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती.
एकूण अनधिकृत शाळा - 43
- बंद शाळा - 30
- सुरू शाळा - 13
- दंड भरणा शाळा - 4
- एकूण दंड वसुली - 4 लक्ष
तालुक्यात सुरू आलेल्या सर्व अनधिकृत शाळांच्या व्यवस्थापक, व्यक्ती आणि मुख्याध्यापक यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.