Actions against 674 unauthorized schools : 674 अनधिकृत शाळांवर कारवाई करणार: शिक्षण संचालक

मुंबई, 11 जानेवारी: राज्याचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी महाराष्ट्रातील एकूण 674 अनधिकृत शाळांवर चालू शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी कारवाई करण्याच्या सूचना सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. (युएनआय च्या वृत्तानुसार)
राज्यात 560 प्राथमिक, 114 माध्यमिक अशा एकूण 674 शाळा अनधिकृतपणे सुरू आहेत.
राज्याच्या विविध भागात अनधिकृत शाळा सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षण संचालनालयाकडे येत आहेत, असे ते म्हणाले.
अनधिकृत शाळा सुरू करून पालकांची फसवणूक झाल्यास त्याची जबाबदारी विभागीय उपसंचालक व शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांचीच राहणार असल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, राज्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - CBSE शाळांच्या बनावट ना-हरकत प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघडकीस आला असून, याप्रकरणी शिक्षण विभागाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्याशिवाय राज्यातील 166 सीबीएसई शाळांची तपासणीही सुरू झाली आहे, असेही ते म्हणाले.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.