Soshal : संघ लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेच्या तयारीसाठी महाज्योती मार्फत आर्थिक साहाय्य

पुणे दिनांक-२४ (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम) महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थे मार्फत ( महाज्योती ) संघ लोकसेवा आयोगाची पुर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ३१४ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेच्या तयारी साठी प्रत्येकी ५० हजार रूपये आर्थिक साहाय्य वितरित करण्याची प्रकिया सुरू असल्याची माहिती संस्थेने दिली आहे.
संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेचा निकाल १२ जून रोजी जाहीर झाला असून महाज्योतीमार्फत इतर मागासवर्ग .विमुक्त भटक्या जमाती.विषेश मागास प्रवर्गातील पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून एकरकमी ५० हजार रूपये अर्थसहाय्याकरिता १६ जून ते ८ जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी ३५६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते.त्यापैकी ३१४ विद्यार्थी या योजनेच्या लाभासाठी प्राप्त ठरले आहेत.या पैकी २९८ विद्यार्थ्यांच्या बॅक खात्यात प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे एकूण १ कोटी ४९ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत .उर्वरित पात्र विद्यार्थ्यांनी बॅक खात्याचा तपशील सादर केल्यावर त्यांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात येईल .
संघ लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होणार असून संबंधित विद्यार्थ्यांना वितरीत केलेल्या अर्थ सहाय्यचा या परीक्षेच्या तयारी साठी लाभ होणार आहे. अशी माहिती महाज्योतीचे प्रकल्प व्यवस्थापक कुणाल शिरसाठे यांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.