परभणीतील विद्यार्थी शाळा सोडून उपोषण स्थळी झाले दाखल : आरक्षण नाही तर आम्ही शाळेतच जाणार नाही, विद्यार्थी झाले उपोषण स्थळी दाखल

पुणे दिनांक २७ ऑक्टोबर ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) मराठा समाज आता आरक्षणांच्या मुद्द्यांवरुन चांगलाच पेटून उठला आहे.आता सर्वच थरातून जोर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.यात आता ज्या विद्यार्थ्यांनचे भविष्य पुढे कशात आहे.हे त्यांना आता चांगलेच कळले आहे.त्यामुळे ही शाळेतील मुलं देखील आता स्पष्टपणे म्हणू लागले आहेत आरक्षण नाही तर शाळा देखील नाही. असे म्हणून ही मुले शाळेतून सरळ परभणी येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी हजर झाले आहेत. ही सर्व मुले परभणी येथील जिल्हा परिषद शाळेतील आहेत.
दरम्यान याप्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार.परभणी जिल्ह्यातील वाघाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकत असून ते आज मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणांला पाठिंबा देण्यासाठी ही सर्व विद्यार्थी वाघाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारका जवळ पोहोचले.व उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते यांच्यात मिसळून घोषणा देत सामील झाले.यावेळी बोलताना ही मुले म्हणाली आम्हाला आरक्षण मिळणार नसेल तर शाळा शिकून काय करणार,? आमचे मायबाप हे रात राबराब राबतात आमच्या सह जगाला खायला घालतात.आम्ही मुलांनी खुप शिकावं मोठ्ठ व्हावा ही त्यांची इच्छा आहे.पण आम्ही कितीही मार्क घेतले तरी आम्ही घरीच राहतो.त्यापेक्षा शिक्षण न घेता त्यांच्या सोबत काम केलेलं बरं आम्ही शाळेतून चाललो.आम्ही नाही येणार अशी उव्दिगन्न प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.