Rajnish Seth : रजनिश सेठ यांच्या हस्ते पुर्व-प्राथमिक प्रियदर्शनी शाळेचे नुतनीकरण कार्यक्रमाचे उदघाटन

०३ नोव्हेंबर २०२२ रोजी पोलीस मुख्यालय,पुणे शहर येथील पुर्व-प्राथमिक प्रियदर्शनी शाळेचे नुतनीकरण झालेल्या वास्तुचे उद्घाटन समारंभ तसेच पोलीस मुख्यालयाचे नुतनीकरण व पुन:समर्पण कार्यक्रमाचे उद्घाटन मा.श्री.रजनिश सेठ (Rajnish Seth),पोलीस महासंचालक,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांचे शुभ हस्ते पार पडले.

मा.पोलीस आयुक्त यांनी मा.पोलीस महासंचालक यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.पोलीस आयुक्त,श्री.अमिताभ गुप्ता (Amithabh Gupta) यांनी केले. सदरवेळी नुतनीकरणामध्ये मोलाचा वाटा असणारे श्रीमती.आरती बनसोडे,सहा.पो.आयुक्त,खडकी विभाग, श्री.दशरथ हाटकर,राखीव पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय,पुणे, किशोरकुमार टेंभुर्णे,राखीव पोलीस उप-निरीक्षक, दत्तात्रय धावडे, सहा.पो.उप.निरी.संतोष जाधव,सहा.पो.उप.निरी. अनिल उपरे,पोलीस अंमलदार, अभिजीत ढमढेरे,कॉन्ट्रॅक्टर, श्री.मनिष राऊत,सिव्हील इंजिनियर, श्रीमती.अर्पिता दिक्षीत, प्रिन्सीपल, प्रियदर्शनी शाळा,पोलीस मुख्यालय, पुणे, श्री.डॉ.राजेंद्र इंद्रकन सिंह,व्यवस्थापकीय संस्थापक,प्रियदर्शनी शाळा, पोलीस मुख्यालय,पुणे यांचा सत्कार मा.श्री.रजनिश सेठ,पोलीस महासंचालक,मुंबई यांचे हस्ते शिवाजीनगर,पोलीस मुख्यालय येथील मॅक हॉल येथे पार पडला.
सदर कार्यक्रमाचे दरम्यान मा.पोलीस महासंचालक यांनी मार्गदर्शन करताना, 1.पोलीस स्टेशन येथे येणा-या प्रत्येक तक्रारदाराचे समाधान झाले पाहिजे व त्यांचे म्हणणे नीट एैकुन घ्यावे. 2.पोलीस स्टेशन, वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस अंमलदार यांनी तक्रारदार यांना चांगली वागणुक दयावी. 3.सायबर विभागामध्ये नविन सुधारणा करण्यात याव्यात. 4.प्रत्येक पोलीस घटकांमध्ये शारिरीक तपासण्या करून घ्याव्यात. 5.पोलीस वसाहती मध्ये राहणा-या सर्वांसाठी हेल्थ कॅम्प घेवुन त्यांची वेळोवेळी तपासणी करण्यावी यावी. 6.पोलीसांसाठी त्यांचे कर्तव्याचे ठिकाणापासुन जवळचे ठिकाणी निवासस्थाने उपलब्ध व्हावी असे मनोगत व्यक्त केले. 7.पुणे शहरातील गणेश उत्सव व इतर महत्वाचे बंदोबस्त व्यवस्थितरित्या पार पाडुन कायदा व सुव्यवस्था उत्तम राखली म्हणुन पुणे शहर पोलीसांचे अभिनंदन केले. त्यानंतर मा.सह पोलीस आयुक्त,श्री.संदीप कर्णिक यांनी आभार प्रदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन म.पो.उप.निरी.सुप्रिया पंढरकर यांनी केले.

सदर कार्यक्रमास मा.श्री.अनुपकुमार सिंह,अपर पोलीस महासंचालक,प्रशासन,महाराष्ट्र राज्य,मुबंई, मा.श्री.चिरंजीव प्रसाद,अपर पोलीस महासंचालक,(राज्य राखीव पोलीस बल), मा.अपर पोलीस आयुक्त, प्रशासन,पुणे,डॉ.जालिंदर सुपेकर, मा.अपर पोलीस आयुक्त,पश्चिम प्रादेशिक विभाग,पुणे,श्री.राजेंद्र डहाळे, मा.अपर पोलीस आयुक्त,पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे,श्री.नामदेव चव्हाण, प्रियदर्शनी पुणे पब्लिक स्कुलचे सी.ई. ओ.श्री.राजेंद्र सिंग, प्रियदर्शनी,पुणे पब्लिक स्कुलचे मुख्याध्यापक,श्रीमती.अर्पिता दिक्षीत व शिक्षक तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.