तलाठी परीक्षा सर्व्हर डाऊन : तलाठी भरती प्रक्रिया परीक्षांमध्ये सर्व्हर यंत्रणा डाऊन विद्यार्थी बसले तटकळ

पुणे दिनांक २१ ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज २१ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी तलाठी भरतीसाठी परीक्षा घेण्यात येत असून ज्या केंद्रावर या परीक्षा घेण्यात येत आहेत येथील सर्हव्हर मध्ये तांत्रिक बिघाडामुळे सकाळी नऊ वाजता सुरू होणीारी ही परीक्षा अजून चालू झाली नाही.त्यामुळे परीक्षा केंद्रावर विद्यार्थी सकाळी सहा वाजल्यापासून ताटकळत उभे आहेत.त्यांना केंद्रावर आत हाॅल मध्ये प्रवेश देण्यात आला नाही.आज परीक्षा होईल का ? व तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर वेळ वाढवून देतील का.? असे प्रश्नचिन्ह या विद्यार्थ्यांना मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान आजपासून सकाळी सत्रा मधील तलाठी भरती परीक्षा या नागपूर.अकोला.लातूर.औंरंगाबाद . अमरावती.याठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून विद्यार्थी केंद्रावर आले होते.त्यांना सकाळी आठ वाजता हाॅल मध्ये प्रवेश देणे बंधनकारक असतानाही तिथे सर्व्हर बंद असल्यामुळे त्यांना प्रवेश देण्यात आला नाही.नऊ वाजता सुरू होणारी परीक्षा अजून चालू झालेली नाही.आज एकूण तीन सत्रात ही परीक्षा आहे.त्यामुळे सर्व्हर डाऊन असल्याने या तलाठी परीक्षाच्या ' तीन तेरा ' वाजल्या आहेत.आता साडे दहा वाजले तरी विद्यार्थी यांचे परीक्षा हाॅल मध्ये रजिस्ट्रेशन झाले न्व्हते ती सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जमावबंदी प्रशासनाला माहिती दिल्यानंतर व त्या नंतर त्यांच्या आदेशानुसार पुढील परीक्षा चालू होणार आहे.
दरम्यान याप्रकरणी अजून एक तासांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांना वेळ वाढवून मिळतो का.? आणि मिळाला तरी पुढील दोन सत्राच्या परीक्षा आता होणार का.? असे अनेक प्रश्न या तलाठी भरती परीक्षा देण्याऱ्या विद्यार्थी यांच्या समोर आहेत.या परीक्षा मध्ये प्रशासनाच्या वतीने प्रचंड गोंधळ आधी पासून केला आहे.यात परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्यांनी मागितलेल्या केंद्रापासून त्यांना अन्य जिल्ह्यांत परीक्षा देण्यासाठी केंद्र दिले आहे.त्यामुळे हे परिक्षा देणारे विद्यार्थी लांबून परीक्षा देण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ताटकळत उभे राहिले.आणि त्यातच सर्व्हर यंत्रणा डाऊन झाल्या मुळे त्यांना शासनाच्या या ' भोंगळ ' कारभाराचा नाहक मनस्ताप सहन करावा लागला.यासर्व गोष्टी कडे शासनला गांभीर्य नाही हेच या सर्व प्रकारा वरुन दिसून येत आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.