तलाठी परिक्षा : राज्यात आजपासून तलाठी पदाच्या परिक्षा सुरू एकूण १० लाख विद्यार्थी परीक्षेस बसले

पुणे दिनांक १७ऑगस्ट ( पोलखोल नामा ऑनलाइन न्यूज टीम) आज पासून संपूर्ण महाराष्ट्रात तलाठी परिक्षा सुरू होत आहे.या परिक्षा मध्ये एकूण ४ हजार ४४६ पदांकरिता १० लाख विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.या परिक्षाचा कालावधी हा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर पर्यंत आहे.या परिक्षा मध्ये अनेक उमेदवारांना त्यांनी निवडलेल्या केंद्रा पासून लांबचे केंद्र मिळाले आहे.त्यामुळे अनेक उमेदवारांची त्रेधा उडाली आहे.त्यामुळे या उमेदवारांना परिक्षा आधी दीड तास परिक्षा केंद्रावर उपस्थिती लावावी लागणार आहे.या परिक्षा साठी प्रवेशिका टप्पा टप्प्यांने भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान या तलाठी परिीक्षा टाटा कन्सल्टंटन्सी सव्हिर्सेस TCS. मार्फत घेण्यात येत आहे.१७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर या कालावधीत दिनांक २३.२४.२५ व दिनांक ३० ऑगस्ट व दिनांक २.३.७.९.व ११.१२ सप्टेंबर वगळून या कालावधीत सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे.या परीक्षांचे संचालन टाटा कन्सल्टंटन्सी सव्हिर्सेस TCS यांच्या माध्यमातून होत असून सदर परिक्षा पुणे आयुक्तालयातील एकूण ११ केंदा्रावर परिक्षा घेण्यात येणार आहे.परिक्षा अत्यंत संवेदनशील असल्याने व परीक्षांचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्त पुणे शहर संदीप कर्णिक यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ घ्या कलम १४४ प्रमाणे आदेश लागू केले आहेत.
दरम्यान पुणे शहर तलाठी भरती प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रावर इमारतीच्या १०० मीटर परिसरात परीक्षा मध्ये बसणारे विद्यार्थी शिक्षक.अधिकारी . कर्मचारी.जिल्हाधिकारी पुणे व परीक्षा नियंत्रक यांनाच परीक्षा केंद्रावर प्रवेश आहे.अन्य व्यक्तींना प्रवेश मनाई करण्यात आली आहे.१०० मीटर परिसरात असलेल्या झेरॉक्स.मोबाईल.लॅपटाॅप . इंटरनेट सेवा.प्रसार माध्यमे अथवा इतर साधने बंद ठेवावीत असे निर्देश दिले आहेत.तसेचसंबंधित परिक्षा केंद्रांच्या इमारती पासून १०० मीटर परिसरात परिक्षा संदर्भात कोणताही मजकूर लिहिण्यासाठी व चिकटवणे साठी मनाई करण्यात आली आहे.सदरचा आदेश हा १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर पर्यंत रात्री १० वाजेपर्यंत अंमलात असणार आहेत.या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भा.दा.वी.कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र राहील.असा आदेश पोलिस सहआयुक्त पुणे शहर संदीप कर्णिक यांनी पत्राद्वारे जारी केला आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.