Actress Rakhi Sawant arrested : माॅडल महिलेचा फोटो वायरल केल्या प्रकरणी अभिनेत्री राखी सांवतला अटक.

नुकतीच आदिल खान दुर्राणीसोबत लग्न करणारी बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा अडचणीत आली आहे. ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. असं सांगितलं जात आहे की राखी सावंत आज दुपारी 3 वाजता तिचा पती आदिलसोबत तिची डान्स अकादमी सुरू करणार होती, त्यापूर्वीच पोलिसांनी तिला शर्लिन चोप्रा प्रकरणात अटक केली.
शर्लिन चोप्राने ट्विटरवर ट्वीट करत लिहिलं, 'ताजी बातमी!!! आंबोली पोलिसांनी FIR 883/2022 प्रकरणी राखी सावंतला अटक केली आहे. काल राखी सावंतचा ABA 1870/2022 मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला.'' नोव्हेंबर 2022 मध्ये शर्लिन चोप्राने राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती आणि तिने पत्रकार परिषदेत तिचा अश्लील व्हिडिओ दाखवताना असभ्य भाषा वापरल्याचा आरोप केला होता.
आंबोली पोलिसांनी राखीला ताब्यात घेतलं. राखी सावंतवर काही काळापूर्वी एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तिच्या तक्रारीवरुन नोव्हेंबर 2022 मध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत राखीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांकडून वारंवार प्रयत्न करूनही ती येत नव्हती. त्यामुळे आज पोलीस पथकाने तिला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. राखी सावंतचा एबीए काल मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळला होता, त्यानंतर आज तिला अटक करण्यात आली आहे.
साजिद खानवरून शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. दोघीही एकमेकांवर घणाघाती आरोप करत आहेत.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.