Y plus security : बिष्णोई गॅंगच्या धमक्यानंतर बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानला मुंबई पोलिसांकडून ' वाय प्लस ' सुरक्षा कवच

बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली ( Y plus security ) आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. तसेच यापूर्वी देखील राजस्थान मधील खतरनाक गॅग विष्णोई टोळी कडून देखील सलमान खानला ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी सलमान खानला ' वाय प्लस ' सुरक्षा ( Y plus security ) कवच देण्याचा निर्णय घेतला आहे.
लॉरेन्स बिष्णोईकडून आलेल्या जिवे मारण्याच्या धमकीमुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपासून मुंबई पोलिसांचा सलमानच्या घरी पहारा सुरू आहे.
एएनआय दरम्यान केलेल्या ट्विटमध्ये यांसंबंधीची अधिक माहिती देण्यात आली आहे. त्यात सलमानला यापुढील काळात वाय प्लस सुरक्षा देणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सिद्धु मुसेवाला प्रकरणातील आरोपी बिष्णोईकडून सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला एक निनावी पत्र सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावानं आले होते. यानंतर सलमाननं त्याविषयी मुंबई पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणानं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.