Dues Notice : बच्चन घराण्याच्या सुनेला थकबाकीची नोटीस. काय आहे नेमक प्रकरण

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मोठ्या अडचणीत सापडली आहे. ऐश्वर्याला थकबाकीसंदर्भात एक नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे ऐश्वर्या राय बच्चनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील आडवाडी गावात पवन ऊर्जा कंपनीत तिची गुंतवणूक आहे. आयकर बचत करण्यासाठी सुजलोन पवन ऊर्जा निर्मिती कंपनीत अनेक कलाकारांननी गुंतवणूक केल्या आहेत. ही कंपनी ऐश्वर्या राय बच्चन हिच्या जमीनवर आहे. ऐश्वर्याची एक हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचं एक वर्षाचं कर ऐश्वर्याने थकवलं आहे. त्यामुळे तिला नोटीस बजावण्यात आली आहे. अभिनेत्रीने 22 हजारांचा कर थकवला आहे. त्यासंदर्भात तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.
Find Nashik News, Dues Notice News, Nashik Entertainement News, latest Nashik marathi news and Headlines based from Nashik City. Latest news belongs to Nashik crime news, Nashik politics news, Nashik business news, Nashik live news and more at Polkholnama.