Ranbveer Singh : रणवीर सिंग म्हणतोय " तो " मी नव्हेच, तो फोटो माझा नाही

मुंबईत काही दिवसापूर्वी अभिनेता रणवीर सिंग यांने एक मासिकासाठी न्यूड फोटो शूट केला होता. हे फोटो मोठ्या प्रमाणात लिंक झाल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. सरकार नंतर रणवीर सिंग याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. आता या सर्व घडामोडीनंतर त्याने खुलासा केला आहे की. हा फोटो माझा नव्हताच. असे त्याचे म्हणणे आहे.' तो मी नव्हेच '
रणवीर यांने त्याचे न्यूड फोटोशूट चे काही फोटो यापूर्वी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यातील त्याच्या एक फोटोमध्ये प्रायव्हेट पार्ट दिसत असल्याचे प्रचंड आरोप होत होता. या प्रकरणात मुंबईतील पोलीस ठाण्यात रणवीर विरोधात तक्रार देखील करण्यात आली होती. ज्यानंतर आता अभिनेत्याने या प्रकरणी आपला जवाब नोंदविल्याचे समोर आले आहे.
यावेळी तो म्हणाला की " आपल्याकडून शेअर करण्यात आलेल्या त्या सात फोटोमध्ये ज्या फोटो मुळे वाद झाला आहे. त्याचा समावेश नव्हता. किंबहुना फोटो morphed. करण्यात आला आहे". पोलिसांनी तो फोटो आता तपासणीसाठी पाठविला आहे. फोटो खरंच morphed. करण्यात आला होता की नाही हे स्पष्ट होणार आहे.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.