Ritesh and Genelia 'Ved' movie collection : रितेश व जेनेलिया च्या " वेड " ने प्रेक्षेकांना लावलं " वेड " चित्रपटांचे कलेक्शन १३. ०२ कोटी पार

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूझा यांना ऑफस्क्रीन तसेच पडद्यावरही खूप आवडते. दोघांची जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. नुकतेच दोघांनी अनेक वर्षांनी स्क्रीन शेअर करून लोकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा यांच्या 'वेड' या मराठी चित्रपटाने थिएटरमध्ये धमाल केली आहे. वेडच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. 'वेड' चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे रितेश देशमुखनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफिसवर स्वतःचे रेकॉर्ड मोडत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी कमावलेल्या कमाईपेक्षा सोमवारी अधिक कमाई केली. वेड हा एक मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये रितेशचा अभिनय खूप दमदार असल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यासोबत जेनेलियाचा अभिनयही लोकांना आवडला आहे.
'वेड' शुक्रवारी, ३० डिसेंबर २०२२ रोजी प्रदर्शित झाला, तेव्हापासून हा चित्रपट थिएटर मध्ये प्रेक्षकांना वेड लावत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली होती. यानंतर चित्रपटाने शनिवारी ३.२५ कोटी आणि रविवारी ४.५० कोटींचा गल्ला जमवला. चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला १० कोटींचा चांगला कलेक्शन मिळवला आणि आता चौथ्या दिवशी १३.०२ कोटी कमावले आहेत.
वेडमध्ये रितेश जेनेलियासोबत जिया शंकर, अशोक सराफ आणि शुभंकर तावडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सलमान खान या चित्रपटात छोट्या भूमिकेत असून तो ॲक्शन करताना दिसणार आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा शेवटचे 'तेरे नाल लव हो गया' चित्रपटात एकत्र दिसले होते.
संपादक : भरत नांदखिले. पोलखोलनामा - लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ.